स्वच्छ महाराष्ट्र सुंदर महाराष्ट्र करतील आ. रोहीत पवार मतदारसंघाचे राणादा – अभिनेत्री अक्षया देवधर

0 11

जामखेड – आमदार रोहित पवार हे या मतदारसंघाचे खरे राणा दा आहेत त्यांनी कर्जत-जामखेड बरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही स्वच्छतेचे काम करावे त्यांच्यात ती धमक आहे ते स्वच्छ महाराष्ट्र सुंदर महाराष्ट्र करू शकतात असे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया देवधर यांनी सांगितले .

स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड या कार्यक्रमा निमित्ताने त्या येथील ल. ना. होशिंग विद्यालयात अयोजीत कार्यक्रमात अभिनेत्री अक्षया देवधर बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, केंद्र शासनाने स्वच्छता दूत गणेश शिंदे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, कर्जत-जामखेडचे विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, राजेंद्र पाटील, पवनराजे राळेभात, युवा नेते महेश राळेभात, महेंद्र राळेभात, राजेश मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, नगरसेवक विद्या वाव्हळ, दिंगाबर चव्हाण, अमित जाधव, मोहन पवार, अमोल गिरमे, लक्ष्मण ढेपे, मनोज भोरे, माजी सभापती सुभाष आव्हाड, देवदैठनचे सरपंच अनिल भोरे, ईस्माईल सय्यद, राजू गोरे सह नगरपरिषद कर्मचारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अक्षया देवधर म्हणाल्या की, प्रत्येकाने घरापासून स्वच्छतेला सुरूवात करा लहान मुलांना स्वच्छतेची सवय लावा मी परत जामखेड शहर पाहण्यासाठी येणार आहे.

Related Posts
1 of 1,292

यावेळी आमदार रोहित पवार यांनी जामखेड शहराच्या सुशोभीकरणाबरोबरच चांगले रस्ते, बागा, क्रिंडागणे व अभ्यासिका लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे असे सांगितले व येत्या तीन वर्षांत जामखेडचा चेहरा-मोहरा बदलून स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड होणार आहे तुम्ही नातेवाईकांना जामखेड दाखवण्यासाठी आणणार आहात

यावेळी केंद्र शासनाचे स्वच्छता दूत गणेश शिंदे यांनी स्वच्छता व शौचालय याचे महत्त्व सांगितले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी प्रास्ताविकात लोकचळवळ वाढावी म्हणून वेगवेगळ्या सामाजिक संस्था व पदाधिकारी यांना स्वच्छ सर्वेक्षण चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: