अहमदनगर जिल्हा रुग्णालय अग्नितांडव तपास Dysp संदीप मिटके यांच्याकडे वर्ग

0 470
अहमदनगर  –   जिल्हा रुग्णालय (Ahmednagar District Hospital ) येथील कोविड अतिदक्षता विभागाला (ICU) शनिवारी लागलेल्या आगीमध्ये 11 रुग्ण मयत झाले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु रजि नं 981 / 2021 भा दं वि कलम 304 (अ ) अन्वये गुन्हा हा पोलिसांनी फिर्याद दिल्यावर च शनिवारी दाखल करण्यात आला आहे . गुन्ह्यांचे गांभीर्य, संवेदनशीलता व व्याप्ती पाहता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके (Sandeep Mitke)  , श्रीरामपूर विभाग ( अतिरिक्त कार्यभार – अहमदनगर शहर विभाग ) यांचे कडे वर्ग केला आहे. (Class to Ahmednagar District Hospital Fire Brigade Investigation Dysp Sandeep Mitke)
घटनास्थळी अद्यापपावेतो राज्याचे आरोग्य मंत्री  राजेश टोपे,  पालकमंत्री हसन मुश्रीफ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , जलसंपदा मंत्री जयंत पाटील नगरविकास , ऊर्जा , आदिवासी विकास , आपत्ती व्यस्थापन , मदत व पुनर्वसन मंत्री प्राजक्त तनपुरे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख विभागीय आयुक्त नाशिक राधाकृष्ण गमे पोलीस उपमहानिरीक्षक श्री बी जी शेखर अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री सौरभ अगरवाल खासदार सुजय विखे , सदाशिव लोखंडे आमदार निलम गोऱ्हे , संग्राम जगताप ,  सत्यजित तांबे , लहू कानडे , रोहित पवार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पोखरणा जिल्हा परिषद अध्यक्षा सौ राजश्रीताई घुले महावितरण सचिव व कमिटी विभागीय आयुक्त कमिटी आदींनी भेटी दिल्या आहेत.

धक्कादायक ! 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींना अटक 

Related Posts
1 of 1,486
पुढील तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली Dy S P संदीप मिटके हे करीत आहेत.(Class to Ahmednagar District Hospital Fire Brigade Investigation Dysp Sandeep Mitke)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: