आगीला सिव्हील सर्जन जबाबदार त्यांच्यावर मनुष्यवधाचा गून्हा दाखल करा – नितीन भुतारे

0 541
अहमदनगर –  अहमदनगर जिल्हा रुग्णालयात (Ahmednagar District Hospital) लागलेल्या  आगीला आणि या आगीत झालेल्या मृत्युला सिव्हील सर्जन (Civil Surgeon) डॉ पोखरण  जबाबदार असून त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक या पदावरून बडतर्फ करावे. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे (Nitin Bhutare) यांनी गृहमंत्री तसेच आरोग्यमंत्री यांना मेल द्वारे निवेदन पाठवुन केली आहे.(Civil Surgeon responsible for the fire, file a case of manslaughter against him – Nitin Bhutare)
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात भीषण आग लागून १० जणांचा मुत्यू झाला असून १३ ते १४ रुग्ण गंभीर स्वरूपाचे भाजले आहे . या पूर्वी देखील राज्यात अशाच प्रकारच्या घटना घडत होत्या त्या वेळेस संपूर्ण हॉस्पिटलची राज्यातील फायर ऑडिट करुण घेण्याचे आदेश आरोग्यमंत्री यांनी दिले होते. तरी सुद्धा अहमदनगर ची शासकीय अधिकारी गहाळ राहिले या सिव्हील हॉस्पिटलचे फायर ऑडिट झालेले आहे का नाही ? झाले असेल तर दर सहा महिन्याला फायर यंत्र सुरळीत चालतात का नाही ? याची खात्री करून घेतली गेली पाहिजे होती. इलेक्ट्रिक यंत्रणा सुरळीत आहे का नाही त्याचे ऑडिट सुध्दा वारंवार करणे गरजेचे होते परंतू असे काही झालेले दिसत नाही.
मागच्या दोन दिवसांपूर्वीच सिव्हील सर्जन यांच्या गाडीला हॉस्पिटलच्या आवारात पार्किंग मध्ये आग लागली होती. इतके झाले तरी बारीक लक्ष ठेवत काळजी घेणे गरजेचे होते. परंतू असे काही झाले नाही दोन दिवसानंतर आज सिव्हिल हॉस्पिटलच्या आय सी यू विभागाला आग लागून १० रुग्णाचा मृत्यु झाला आहे तर १३ ते १४  जण गंभीर जखमी आहेत.
Related Posts
1 of 1,517
या सर्व प्रकाराला दोन दिवसांपूर्वी याच हॉस्पिटलच्या आवारात पार्कींग मध्ये गाडीला आग लागून सुध्दा व्यवस्थित चौकशी केली गेली नसल्यामुळे सिव्हील सर्जन डॉ पोखरणांच्या हलगर्जपणामुळे हा प्रकार झाला असुन त्यस सर्वस्वी  सिव्हील सर्जन डॉक्टर पोखरणा हेच जबाबदार आहेत . त्यामुळे त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक या पदावरून बडतर्फ करावे. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी मनसेच्या नितीन भुतारे यांनी गृहमंत्री तसेच आरोग्यमंत्री यांना मेल द्वारे निवेदन पाठवुन केली आहे. तसेच झोपलेल्या पालकमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे. (Civil Surgeon responsible for the fire, file a case of manslaughter against him – Nitin Bhutare)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: