नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत नगरसेवक उदासीन, नगरसेवक यांच्यासह नागरिक करणार उपोषण

0 72

 

 श्रीगोंदा ;- श्रीगोंदा नगरपरिषदेच्या (Shrigonda Municipal Council) कामकाजाबाबत अनेक नगरसेवक तसेच अनेक सर्व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात नाराज असून कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत हे खड्डे बुजवणे कमी अनेकदा पत्रव्यवहार करूनही नगरपरिषदेला जाग येत नसल्यामुळे आता खुद्द नगरसेवकासह नागरिक नगरपरिषदेच्या दारात आमरण उपोषण (hunger strike) करणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून श्रीगोंदा शहरात रस्ते बांधणी करण्यात आली मात्र अनेक ठिकाणी कामात दिरंगाई झाली आहे  श्रीगोंदा नगरपालिका हद्दीतील विविध १७ रस्ते विकसित केलेले आहेत . या रस्त्यांवरती पारगाव रोडसह सर्व रस्त्यावर अनेक मोठे खड्डे पडलेले असून त्यामुळे अपघात झालेले आहेत . सदर रस्त्यांवरील खड्डे बुजविणे कामी वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे.

 

Related Posts
1 of 2,222
तरी देखील प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केलेली नाही . यामुळे काही नगरसेवक व नागरिक दि १३ जून सकाळी 11:30 पासुन नगरपरिषदेच्या दारात उपोषण करणार आहे . तरी या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी श्रीगोंदा नगरपरिषद यांची राहील अश्या आश्ययाचे निवेदन त्यांनी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.

 

 या निवेदनावर नगरसेवक शहाजी खेतमाळीस ,सुनील वाळके,ज्योती सुधीर खेडकर,मनीषा लांडे,घोडके संग्राम,आसाराम खेंडके,महावीर पटवा, दीपाली औटी,छायाताई गोरे,रमेश लाढाणे, वनिता क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींच्या निवेदनावर सह्या आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: