उघडपणे मावा विक्री चालू, कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची नागरिकांची मागणी

0 571

अहमदनगर  – भिंगार शहरांमधील अल्पवयीन मुले तसेच वयोवृध्द पुरुष त्यांना विषारी मावयामुळे कॅन्सर झाला आहे भिंगारमध्ये दर वर्षी 8 ते 10 लोकांना मावयामुळे जीव गमवावा लागत आहे.  मावयामध्ये घातक द्रव्य घालत असून मावा कसा जास्तीत जास्त स्ट्रॉंग होईल याचे मावा विक्री करणाऱ्या मध्ये चड ओढ लागलेली आहे. माव्यां मध्ये घातलेल्या त्या घातक ऍसिड  व झडूबाम टाकल्याने तोंड सडून तोंडाचे कॅन्सर होत आहे.

त्यामुळे भिंगार शहरामध्ये संपूर्ण माव्याच्या टपऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांच्या वतीने अन्न व औषध प्रशासन च्या सहाय्यक आयुक्त कार्यालय प्रमुख स.पा.शिदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद, काँग्रेस आय पार्टी प्रदेश अध्यक्ष श्याम वाघस्कर, भारतीय जनता पार्टीचे प्रकाश लूनिया, आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे नईम शेख शाहनवाज काजी ,दिलनवाज शेख ,सागर चाबुकस्वार ,विकास चव्हाण, सनी खरारे ,सिद्धार्थ आढाव आदी सहा नागरिक उपस्थित होते.

हे पण पहा –किरीट सोमय्या यांना देणार करारा जवाब | मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलवली तातडीची पत्रकार परिषद

भिंगारमध्ये अन्न व औषध प्रशासन ऑफिस नेमले असून त्यांनी आतापर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नसल्यामुळे त्या अधिकाऱ्यांना मावा विक्रेत्यांकडून हप्ता चालू असावा याची चौकशी करून त्या अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे. पोलीस प्रशासन हे तात्पुरती स्वरूपाची कारवाई करून मावा विक्री हे अन्न व औषध प्रशासन यांच्या कडे खाते असल्यामुळे त्याबाबत कार्यवाही करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाकडे असल्यामुळे यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी ज्या वयात मुलांना काजू बदाम खायचे आहे त्या वयात हे लहान मुले मावा खात आहे .

Related Posts
1 of 1,603

लहान मुले ही आपल्या देशाची संपत्ती आहे कमी वयात हे मुले विषारी माव्याचे आहारी जात आहे मावा विक्री करणाऱ्यांवर कोणतीही दयामाया न दाखवता त्यांचे दुकाने सील करून त्यांच्या व कठोर कारवाई करावी अन्यथा 16 सप्टेंबरला आपल्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

द्राक्ष व्यापाऱ्याची दुबईच्या कंपनीकडून फसवणूक, गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: