
श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील पूर्वापार रस्ता खुला करून मिळणेसाठी पेडगाव येथील नागरिकांचे उद्या सकाळी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनातून देण्यात आले आहे .
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील सिटी सर्व्हे न108 व 110 मध्ये एकनाथ ध्यानदेव श्रीरसागर यांनी हे क्षेत्र 1 जून 2016 रोजी खरेदी खताने कायमस्वरूपी खरेदी घेतले आहे त्यास येण्यासाठी जाण्यासाठी वाहिवाटीचा रस्ता अशी नोंद असताना तरीही सिटी सर्व्हे न 112 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या बखळ व खुल्या जागेवर बेकायदेशीर पणे अतिक्रमण करून रातोरात नव्याने बांधकाम करण्यासाठी जेसीबीच्या साह्याने पाया खोदून सिटी सर्व्हे न 108 व 110 तसेच 111 मधील सर्व खातेदार यांचा वाहिवाटीच रस्ता बंद पाडून त्यांना त्यांचा घराबाहेर पडणे तसेच वागणे मुश्किल केले असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी राहणे मुस्किल झाले आहे .
त्यामुळे शासकीय जागेत केलेले अतिक्रमण खुले करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह उद्या दि 4 रोजी तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन त्यांनी तहसीलदार कार्यलयाला दिले यादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनात एकनाथ ज्ञानदेव, क्षीरसागर संतोष, ज्ञानदेव क्षीरसागर, गणेश एकनाथ क्षीरसागर ,पुष्पा क्षीरसागर ,छगन देवराव भांडवलकर ,एस बी श्रीरसागर आदी मान्यवर मंडळींच्या सह्या आहेत या आशयाचे निवेदन त्यांनी तहसीलदार श्रीगोंदा, उपअधीक्षक भूमिअभिलेख, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा तसेच ग्रामविकास अधिकारी पेडगाव याना दिले आहे तर पत्र महितीस्तव जिल्हाधिकारी अहमदनगर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई यांना दिली आहे.