नागरिक फिरतात पाण्यासाठी दाहीदिशा मात्र पंचायत समिती प्रशासन गोड झोपेतच

0 180
Citizens go for water, but the Panchayat Samiti administration is still asleep
 
श्रीगोंदा ;-  श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे गावातील पाण्याचे सर्व पाझरस्रोत आटले असताना सरकारलाही पाझर फुटेना, अशा पाणीटंचाईच्या भीषण संकटात सापडलेला समाज पाण्यासाठी पायपीट करीत आहे. ग्रामीण भागातील महिला धारात काटेकुटे, झुडपे, तुडवत, दगड-धोंडय़ांना ठेचकाळत, डोक्यावर रिकामी घागर घेऊन पाण्याच्या शोधात भटकत असतात हे भीषण वास्तव आहे. (Citizens go for water, but the Panchayat Samiti administration is still asleep)
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी  पाण्याची तीव्र टंचाई भासते. हे वास्तव नेहमीचेच. या पाणीटंचाईने कोरडय़ा पडलेल्या घशातून धरण उशाशी, कोरड घशाशी असे उच्चारण करण्याचे त्राणही या महिलांमध्ये राहिलेले नाहीत. तालुक्यातील आदिवासी पाडय़ावर असलेली भीषण पाणीटंचाई हृदय पिळवटून टाकते. डोक्यावर, कमरेवर हंडी, कळशी, पाण्याच्या शोधात निघालेली महिला असे चित्र पाहून कोणालाही दया येईल. परंतु व्यवस्थेला मात्र त्याची फिकीर नसल्याचे पाहून मन अस्वस्थ होते.
तालुक्यातील टाकळी कडे हे गाव साधारण २२०० लोकवस्तीचा आहे पिण्यासाठी पाणीच नसल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी दिवस-रात्र भटकावे लागते. दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि नंतर पाण्याचा शोध घ्यायचा एवढाच दिनक्रम. गावातील विहिरीने तळ गाठला. तासनतास वेळ घालवल्यानंतर एखादा-दुसरा हंडा भरतो, ज्या ठिकाणी थोडेफार पाणी मिळेल अश्या ठिकाणी महिलांची रांग लागते. वर्षांनुवर्षे हीच दुरावस्था होत आहे. केवळ माणूसच नाही तर मुकी जनावरेही या पाणीटंचाईला बळी पडत आहेत. लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीवेळी येतात आणि आश्वासन देऊन निघून जातात. पाणीटंचाई तशीच राहाते.त्यामुळे नागरिक फिरतायेत पाण्यासाठी दाहीदिशा, पंचायत समिती प्रशासन झोपेतच असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

 

Related Posts
1 of 2,452
कूपनलिका आटली पाणी फिल्टर बंद लेकीसुनांचा संघर्ष जुनाच
लग्न करून गावात सून म्हणून आलेल्या नवविवाहितेला चुडा उतरण्याच्या आधी डोक्यावर हंडा घेऊन दाहीदिशा भटकंती करीत पाणी शोधण्याची वेळ येते. हा केवळ या एकाच गावाचा प्रश्न नाही. आजूबाजूच्या अनेक गावांची ही समस्या आहे. गावातील लेकींना लहानपणापासूनच पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, सुनांना लग्न झाल्यापासून पाण्याच्या खेपा मारायला जुंपावे लागते, म्हणूनच पेयजल योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी होत आहे.

 

 

पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार – सरपंच 
टाकळी कडे मधील गावात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समिती स्तरावर अथवा सुटलेल्या घोडच्या उन्हाळी आवर्तनात पिण्याच्या पाण्यासाठी वाढीव आवर्तन मिळावे अशी मागणी करणार असून त्यासाठी सर्वानी पक्ष निष्ठा सोडून एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे तरी सर्वानी एकत्र येऊन पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवू असे आस्वासन सरपंच रुपाली इथापे यांनी दिले आहे.  (Citizens go for water, but the Panchayat Samiti administration is still asleep)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: