विधवा महिलेचे दागिने मोडल्याचा प्रकार दडपण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याचे जोरदार प्रयत्न

0 279
श्रीगोंदा   :-  श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील देऊळगाव गलांडे याठिकाणी कोर्टाच्या आदेशानुसार जमिनीची नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने (Circle officer) विधवा महिलेला (Widowed women) दागिने बोलण्याचा प्रकार घडला असून हा प्रकार दडपण्यासाठी संबंधित मंडळाधिकारी यांनी विधवा महिलेच्या घरी जाऊन त्या महिलेचा वीस हजार (Twenty Thousand) रुपये रोख देऊन तिच्याकडून शंभर रुपयाच्या मुद्रांकावर माझी कोणतीही तक्रार नसल्याचे लिहून घेतल्याचे समजत आहे.  मात्र जर पैसे घेतलेच नव्हते तर पैसे दिले का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे या ठिकाणी राहणाऱ्या एका विधवा महिलेचा जमिनीचा वाद न्याय प्रविष्ट होतात काही दिवसांनंतर त्या जमिनीचा निकाल तिच्या बाजूने लागल्यानंतर त्या न्यायालयाच्या आदेशानुसार तिची महसूल दप्तरी नोंद होणे गरजेचे होते.  त्यानुसार न्यायालयाने त्याची नोंद व्हावी असा आदेश पारित केला मात्र संबंधित महिला तलाठी यांनी ती नोंद पकडलेल्या नंतर त्या कालावधीमध्ये कार्यरत असलेल्या मंडळ अधिकाऱ्यांनी ती नोंद रद्द केली दरम्यान कालावधीमध्ये कोरोना वाढत असल्यामुळे मंडळ अधिकारी यांनी नोंद रद्द केलेली कोणाच्याही लक्षात आले नाही.
 मात्र याबाबत संबंधित महिलेने महिला तलाठी यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला मात्र ती नोंद मंडळाधिकारी यांनी रद्द केल्याची त्यांच्या लक्षात आल्यानंतर महिलेच्या विनंतीवरून महिला तलाठी यांनी ती नोंद पुन्हा पकडली मात्र त्यावेळेस संबंधित मंडळाधिकारी हे काही कारणास्तव रजेवर गेल्यानंतर त्या ठिकाणचा चार्ज तात्पुरत्या मंडळाधिकारी यांच्याकडे देण्यात आला त्या वेळी त्या मंडळ अधिकाऱ्याने संबंधित महिलेला 25 हजार रुपयांची मागणी केली मात्र संबंधित महिला यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांना शेवटी त्यांच्या अंगावरील दागिने श्रीगोंदा शहरातील एका सोनाराकडे मोडून त्यांनी त्या संबंधित मंडळाधिकारी यास पंचवीस हजार रुपये दिले न्यायालयीन आदेशानुसार सातबऱ्यात नोंद करण्यात आली मात्र झालेली तडजोड काही पत्रकार मंडळींना माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी बातम्या प्रसिद्ध करताच मंडळ अधिकारी हे खडबडून जागे झाले त्यांनी तात्काळ घाव होण्याच्या आगोदर संबंधित महिलेची भेट घेतली आणि तडजोड करत तब्बल 20 हजार रुपये त्या महिलेला दिले आणि तिच्याकडून 100 रुपयाच्या स्टॅम्प वर माझी कोणत्याही प्रकारची तक्रार नाही असे लिहून घेतले आहे.  त्या स्टॅम्प वर गावातील चार लोकांच्या साक्षीदार म्हणून साह्य आहेत अश्या प्रकारे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न मंडळ अधिकारी यांनी केला आहे.
मला संगणक येत नाही हाताखालच्या मुलाने नोंद मजूर केली- मंडळ अधिकारी
मला संगणक चालवता येत नाहीं त्यामुळे मी माझ्या हाताखाली एक खाजगी संगणक चालक ठेवला आहे अधिकारी यांचे सारखे फोन येत असल्याने त्यांच्या हातून नोंद मंजूर करण्यात आली अशी माहिती मंडळ अधिकारी यांनी दिली आहे.
Related Posts
1 of 1,481
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: