फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांनी सिनेस्टाइल पकडला

श्रीगोंदा ;- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील विलास विठ्ठल वाकुंज (वय 54 वर्षे ) यांनी तालुक्यातील नागवडे सहकारी साखर कारखाना यांच्या सोबत सन 2021-2022 या आर्थिक वर्षांच्या गळीत हंगामासाठी ऊस वाहतुकीचा करार केला होता वाहतूक कराराच्या पोटी टोळी मुकादम यांच्यासोबत करार करुण लेबर पुरविण्याचे मान्य केले मात्र त्यांनी त्यावर आपला शब्द पलटवला ऊस तोडणी करण्यासाठी कोणीही आले नाही त्यावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यावरून तपासाची चक्रे फिरल्यावर पोलिसांनी भोकरदन या याठिकाणी जाऊन सिनेस्टाइल ने पकडले आहे.