पाझर तलावावरील अतिक्रमणाबाबत चिंभळे ग्रामंपचायतची टाळाटाळ: तहसिलदार यांच्या आदेशाची पायमल्ली

प्रतिनिधी DNA मराठी टीम
श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे ग्रामंपचायतीच्या अखत्यारीत असलेल्या पाझर तलाव क्रं.१ वर मोठया प्रमाणात अतिक्रमण झाले असुन त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश तहसिलदार श्रीगोंदा, जिल्हा जलसंधारण अधिकारी व जिल्हा परिषदाचे कार्यकारी अधिकाऱ्यांनी देऊनही ग्रामपंचायत त्याकडे दुलर्भ करत असल्याची तक्रार भाऊसाहेब संपतराव गायकवाड यांनी केली आहे.
याबाबत गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की पठारवाडी पाझर तलावामध्ये अनेक वर्षापासुन सातत्याने अतिक्रमण होत आहे. शासकीय जागेत मोठमोठे घरे जनावराचे गोठे तसेच शासनाचे अनुदानातुन कांदा चाळ तयार केलेले आहे. संबधीतांचे विरोधात गायकवाड यांनी तालुका स्तरावरील व जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या उपोषणे केली. श्रीगोंदा तहसिलदार यांनी तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा यांनी चिंभळे ग्रामपंचायतीस अतिक्रमण काढण्या संबधी योग्य ते आदेश दिले. मात्र ग्रामपंचायत अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करत आहे.
भाऊसाहेब गायकवाड यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असुन त्या निवेदनात गायकवाड म्हणतात दि. १५ नोव्हेंबर २००३ सालापासुन सदरील पाझर तलावाचे हस्तांतरण जिल्हा परिषदे ने चिंभळे ग्रामपंचायतीकडे केलेले आहे. या पाझर तलावामध्ये टोलेजंग इमारती शेततळी कांदा चाळ व शेती याकामी मोठया प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहे. अतिक्रमण करणारे समाज’ कटंक स्थानिकांना दमदाटी करुन दररोज अतिक्रमण वाढवित आहेत. जवळपास ६० एकर असलेला पाझर तलाव केवळ चिंभळे ग्रामंपचायतीच्या दुर्लक्षामुळे १० एकरावरती आलेला आहे. अतिक्रमणधारकांनी पाझर तलावाची सांड अनाधिकृतपणे तोडली असल्याने पाझर तलावातील भूजल पातळी अंत्यत कमी झालेली आहे. अतिक्रमण करणाऱ्या विध्वसंक प्रवृत्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असताना ग्रामपंचायतच्या अर्थपुर्ण संबधामुळे त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. संपुर्ण पाझर तलावाची मोजणी करण्याचे संबधीत अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही ग्रामंपचायतीने आजपर्यत मोजणीची चलन पावती भरलेली नाही. या अतिक्रमण धारकांवर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा भाऊसाहेब गायकवाड यांनी दिला आहे.