कंटेनरच्या धडकेत मुलाचा मृत्यू: आई जखमी

0 90
Horrific accidents in petrol tankers and trucks; 6 died on the spot

 

अहमदनगर – कंटेनरच्या झालेल्या अपघातात मुलगा जागीच ठार झाले तर आई गंभीर जखमी झाली आहे. नगर औरंगाबाद महामार्गावर शेंडी (ता. नगर) शिवारात ही घटना घडली. बाबासाहेब काशिनाथ टेकाळे ( वय ४० रा. बीड) असे मयत व्यक्तीचे नाव असून त्यांची आई झुंबराबाई काशिनाथ टेकाळे (वय ६५) या जखमी झाल्या आहेत.

 

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पिंपळगाव ‘पाळवी येथील मेहेर बाबाच्या दवाखान्यामध्ये मायलेक गेले होते.

Related Posts
1 of 2,177

तेथून परतत असताना उभ्या असलेल्या कंटेनरच्या सावलीला हे माय लेक बसले असता कंटेनर चालकाने कंटेनर सुरू करून पुढे घेतल्याने मुलगा कंटेनरच्या टायरखाली सापडुन त्याचा जागीच मृत्यू झाला तर आई झुंबराबाई हिच्या पायावरून कंटेनर ‘गेल्याने ती जखमी झाली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: