मोबाईल खेळतो म्हणून हटकल्याने मुलाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

0 151

 बुलडाणा-   देशात कोरोना (Corona) विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउन (Lock Down) नंतर अल्पवीय मुलांमध्ये मोबाईल (Mobile)चा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे. कोरोना संकटामुळे मागच्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक सत्र हे ऑनलाईनच्या माध्यमातून सुरु आहे.  मात्र या शिक्षणासोबतच मुलं ऑनलाईन गेमच्या सुद्धा आहारी जात आहे. असाच एक प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मधून समोर आला आहे. एका १६ वर्षीय मुलाला घरातील सदस्यांनी मोबाईलवर गेम खेळतो म्हणून हटकल्याच्या रागाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतक १६ वर्षीय मुलाचं राहुल राऊत असं नाव आहे.

हे पण पहा – बॅलन्स सीट जुळल्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यात येतील | खासदार विखेंचा घणाघात

 मिळालेल्या माहितीनुसार राहुल सतत मोबाईलवर गेम खेळत असे . त्यामुळे त्याच्या पालकांनी मोबाईलमध्ये गेम खेळू नको म्हणून हटकले. त्यानंतर तो रागाच्या भरात घरातून निघून गेला. आपल्या पालकांचा बोलण्याचा त्याला प्रचंड राग आला होता. त्यामुळे आपण घरी येणारच नाही, असं रागात तो म्हणाला होता. त्यानंतर राहुलच्या घराशेजारीच एक विहीर आहे. राहुलने मागचापुढचा कोणताही विचार न करता थेट विहिरीत उडी मारली. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा दुर्देवाने विहीरीत बुडून मृत्यू झाला.

Related Posts
1 of 1,622

एक लाखाच्या लाचेची मागणी, पोलीस निरीक्षकावर एसीबीची कारवाई

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: