मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

0 298
नवी मुंबई –   मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या  एसटी कर्मचाऱ्यांचे (ST employees) संपामुळे राज्यातील सामान्यनागरिकांना अनेक अडीअडचणीचा सामना करावा लागत आहे. या आंदोलनात  १२ पेक्षा जास्त एस टी  कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.  ही सर्व परिस्थिती पाहत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संप करणाऱ्या  एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन केले आहे. (Chief Minister Uddhav Thackeray’s appeal to ST employees)
Related Posts
1 of 1,512
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.

अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा  मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.

राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या. अशी विनंती त्यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केली आहे. (Chief Minister Uddhav Thackeray’s appeal to ST employees)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: