अन् मुख्यमंत्र्यांनी केला जमिनीवर बसून निषेध, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0 332

लखनऊ-   उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे शेतकऱ्यांसोबत (Farmers) झालेल्या हिंसाचारानंतर आता या प्रकरणात राजकारण सुरू झाला आहे.  छत्तीसगड (Chhattisgarh) चे मुख्यमंत्री (Chief Minister)   भूपेश बघेल (Bhupesh Baghel)  हे पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी  जात असताना  पोलिसांनी त्यांना विमानतळावरच अडवलं . त्यांना पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी पोलिसांनी दिली नाही.   बघेल  हे लखनऊ विमानतळावर पोहोचल्यानंतर लखीमपूर खीरी कडे जाण्यासाठी निघाले असता  पोलिसांनी त्यांना लखनऊ विमानतळातून बाहेर पडण्यापासून रोखले. त्यानंतर भूपेश बघेल विमानतळावरच जमिनीवर बसून सरकारचा निषेध केला.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे बाहेर पडण्यापासून रोखल्याची माहिती दिली. या संदर्भात त्यांनी सांगितले की मला कोणत्याही आदेशा शिवाय लखनऊ विमानतळाच्या बाहेर जाण्यापासून रोखले जात आहे. विमानतळात जमिनीवर बसलेल्या बघेल यांनी स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये ते जमिनीवर बसलेले दिसत असून, त्यांच्या अवतीभवती यूपी पोलिस दिसत आहेत.
Related Posts
1 of 1,640

 

प्रियंका गांधींना अटक 
उत्तर प्रदेशच्या सीतापूर मध्ये गेल्या 36 तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधी यांनी कलम 144 चं उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी रोष व्यक्त केला आहे. प्रियंका गांधींना थोड्याच वेळात कोर्टासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: