
अहमदनगर- छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांच्या पतसंस्थेला या आर्थिक वर्षात सुमारे नऊ कोटीचा ढोबळ नफा झाला आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे यांनी दिली.
बनसोडे म्हणाले की, छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांच्या पतसंस्थेची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 28 मे रोजी श्री क्षेत्र देवगड येथे होत आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाल्या नंतर आपण संस्थेचा प्रगती आलेख उंचाविण्यासाठी प्रयत्न केलेला आहे.
उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे म्हणाले की संस्थेचे कार्यालय सीसीटीव्ही युक्त असून संचालक मंडळाचे थेट मोबाईलवर संस्थेचे कामकाज दिसून येते व संस्थेला आयएसओ मानांकन प्राप्त आहे. हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे.
संस्थेचे मानद सचिव चंद्रकांत तापकीर यांनी सांगितले की सर्व सभासदांचा 20 लाखाचा अपघात विमा उतरविण्यात आलेला आहे. संस्था स्वभांडवली करण्याच्या दृषटीने एक पाऊल पुढे टाकीत कायमठेवीत दरमहा रुपये एक हजाराने वाढ करण्यात आली आहे. कुटुंब आधार योजना सुरू करण्यात आली आहे व सभासदांना ई पासबुक सुविधा देण्यात आलेली आहे.
अध्यक्ष बनसोडे हणाले की, 10 जून 2020 या संस्थेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली . तेव्हापासून ते 30 एप्रिल 2022 अखेरपर्यंत संस्थेचे एकूण ठेवीत ५५ कोटी ८३ लाख 26 हजार 358 एव्हढ्या ठेवी वाढल्या आहेत. पूर्वी संस्थेच्या ठेवी 30 कोटी 41 लाख 88 हजार 53 एव्हढ्या होत्या. आता त्या 86 कोटी 25 लाख 12 हजार 411 झालेल्या आहेत. संस्थेचे सध्याचे भाग भांडवल रुपये चार कोटी 71 लाख 20 हजार 838 आहे. रिझर्व्ह फंड दोन कोटी 17 लाख 44 हजार 745 आहे.
या सभेला दादासाहेब डौले, प्रमोद कानडे, सुरेश मंडलिक, दादासाहेब शेळके, सुरेश खरड, प्रशांत सातपुते, सुनीता बर्वे, किशोर जेजुरकर, राजेंद्र बागले, अर्चना कडू, रामदास जाधव, जयराम ठुबे, संजय गवळी, बाळासाहेब मेहेत्रे, संजय गिऱ्हे, अरुण गाढवे, अशोक जगदाळे, तुळशीराम दिनकर आदींसह सर्व सभासद उपस्थित राहणार आहेत.
या कारकीर्दीत 56 कोटी रुपयांच्या ठेवी वाढल्या आहेत .या वर्षी सभासदांना कायम ठेवी वर रुपये दोन कोटी पाच लाख ,लाभांश रुपये 66 लाख 81 हजार आणि व्याज रिबेट रुपये 95 लाखअसे एकूण 3 कोटी 66 लाख रुपये सभासदांना वाटप करण्यात येत आहे. सुदाम बनसोडे, अध्यक्ष