छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रम करून साजरी

0 13

जामखेड –  छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ जयंती विविध कार्यक्रम सादर करून शहर व तालुक्यात विविध संघटना, राजकीय पक्ष यांनी उत्साहाने साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सिध्दीविनायक ट्रस्टच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवाला आ. रोहीत पवार यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी जिजाऊ प्रतिज्ञा छत्रपती घेण्यात आली यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, नगरपरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी मिनिनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक राजू थोरात, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. शोभा अरोळे, सुलताना भाभी, मनसेचे पै.दादासाहेब सरनोबत, कुसडगावचे सरपंच बापूसाहेब कार्ले ,वैभव जमकावळे, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टाफरे, सनी सदाफुले, गणेश पवार, सनी सदाफुले, दादा महाडिक, बापूसाहेब गायकवाड, राजू सय्यद, आदि उपस्थित होते.

अमरावती येथून अपहरण केलेल्या ४ वर्षाचे मुलाची अहमदनगर येथून सुटका

यावेळी क्रांती ग्रुपच्या वतीने दांडपट्टा, कराटे, मल्लखांब, तलवारबाजी यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले यावेळी आ. रोहीत पवार यांच्या हस्ते ग्रामीण आरोग्य प्रकल्प व ग्रामीण रूग्णालयातील परिचारिका, नगरपरिषद महिला सफाई कर्मचारी यांना साडी व ट्राफी देऊन सत्कार करण्यात आला. अधिकारी, पत्रकार यांना कोरोना वॉरीयर म्हणून सन्मानित करण्यात आले दिवसभर पोवाडे गायन करण्यात आले.
आम आदमी पक्षाच्या वतीने कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास संतोष नवलाखा, बजरंग सरडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिव्हाळा फौंडेशन, कोठारी फौंडेशन, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, विद्यालय यांनी शिवजयंती उत्सहात साजरी केली. योद्धा ग्रुपच्या वतीने ११३ बाटल्या रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभीवादन करण्यात आले.

मग विधानसभा अध्यक्षांचा राजीनामाच आम्ही होऊ दिला नसता. –  अजित पवार 

Related Posts
1 of 1,290

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमदार रोहित पवार   जामखेडमध्ये आले होते. कार्यक्रमादरम्यान अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. मात्र रोहित पवार यांनी आपले संबोधन सुरू ठेवले. ते म्हणाले की, आज शिवजयंतीनिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आज येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. काही तरुणांनी मर्दाने खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले. आज करण्यासारखे खूप होते. मात्र अचानक पाऊस आला. त्यामुळे कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. मी आयोजकांना एवढेच सांगतो की, पाऊस आला असला तरी तुमचे प्रयत्न हे महत्त्वाचे होते. उद्देश महत्त्वाचा होता. दिवस चांगला होता. अशाच प्रकारे लोकांच्या सेवेसाठी तुम्ही काम करत राहा, असे आवाहनही रोहित पवार यांनी यावेळी केले. दरम्यान, पाऊस सुरू असतानाही रोहित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधल्याने अनेकांना शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली.

बसस्थानक परिसरात चोऱ्या करणाऱ्या महिलांकडून अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: