
प्रतिनिधी DNA मराठी टीम
कोल्हापूर – खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठं विधान केला आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मंगळवारी कोल्हापूर (Kolhapur) उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (By-election) मतदान पार पडलं. मतदानानंतर संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Chhatrapati Sambhaji Raje’s big statement: many discussions abound; Said, after May 3 ..)
यावेळी बोलताना त्यांनी ३ मे नंतर माझी राजकीय दिशा स्पष्ट करणार असून ती नक्की वेगळी असेल असं जाहीर केलं. त्यामुळे संभाजीराजे भाजपा, शिवसेना किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असं अनेक चर्चंना उधाण आले आहे. ३ मे रोजी संभाजीराजेंची खासदारकीची मुदत संपत आहे.
खासदारकीचा कार्यकाळ संपल्यावर तुमची राजकीय भूमिका काय असेल? असं प्रसारमाध्यमांनी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “वेट अँड वॉच आहे…३ मे रोजी माझी मुदत संपत आहे. निश्चित वेगळी दिशा असणार यामध्ये काही दुमत नाही. पण काय दिशा असणार आहे त्यासाठी वाट पाहूयात. ३ मे नंतर आपण पुन्हा एकदा बोलू असं उत्तर त्यांनी दिला. (Chhatrapati Sambhaji Raje’s big statement: many discussions abound; Said, after May 3 ..)