“त्या ” प्रकरणात खासदार जलीलांसह 26 जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

0 243
औरंगाबाद –   राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून सुरु झालेल्या कोरोना विषाणू (Corona virus) च्या दुसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये बंद असलेली दुकाने उघडावीत यासाठी कामगार उपायुक्तांच्या सोबत हुज्जत घालणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एमआयएमचे (MIM) औरंगाबाद खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकारात आता खासदारांसह 26 दुकानदार विरुद्ध दाखल गुन्ह्याचे 313 पानांचे दोषारोपपत्र (Chargesheet) तपास अधिकारी तथा क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी न्यायालयात दाखल केले आहेत.
Related Posts
1 of 1,640

औरंगाबाद (Aurangabad) शहरात लॉकडाउनमध्ये नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांची 56 दुकाने मे महिन्यात प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आली होती. या दुकानांचे सील काढावे याकरिता खासदारांनी शहरातील 24 दुकानदारांना घेऊन 1 जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या कार्यालयात गेले. त्या ठिकाणी त्यांनी दुकानाचे सील काढावे यासाठी उद्धटपणे बोलून पोळ यांच्यावर दबाव टाकला होता. तसेच मागण्या पूर्ण होईपर्यंत येथून उठणार नाही आणि दुकानाचे सील काढत नाही तोपर्यंत तुला येऊ देणार नाही. अशी दमदाटी खासदार यांनी केली होती. यासंदर्भात उपायुक्त शैलेंद्र पोळ यांनी 2 जून रोजी रात्री उशिरा क्रांती चौक पोलिस ठाण्यात जलील यांच्यासह इतरांविरुद्ध तक्रार नोंदवली होती.

हे पण पहा –  Pimpri Chinchwad | दुकान मालकावर कोयत्याने सपासप वार

खासदार जलील यांच्यासह व्यापारी 26 जणांविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, गैर कायद्याची मंडळी जमा होणे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणे आदींबाबत कलम 353, 332, 143, 147, 149, 188, 269 आणि 270 यासह महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 135 नुसार 313 पानांचे दोषारोपपत्र तीस प्रतींमध्ये न्यायालयात दाखल केले आहे.

वाळू चोरी पकडण्यासाठी गेलेल्या तलाठी व होमगार्डला दमदाटी, गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: