
मुंबई : राज्यातील कृषी सहाय्यकांच्या पदाबाबत आ. राम शिंदे (Ram shinde)यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी कृषी सहायक या पदनामात बदल करून सहाय्यक कृषी (Agriculture) अधिकारी असा बदल करण्याचा निर्णय येत्या १५ दिवसांत सरकारकडून घेण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्वाचा प्रश्न निकाली निघाला आहे. आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कृषी विभागात कार्यरत असलेल्या हजारो कृषी सहाय्यकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सत्तेच्या नशेत नेत्यांकडून गैर कृत्यांचे प्रकार वाढ, राजकारणात डागाळलेली नेते, तरीही मी तो नव्हेच.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान विधानपरिषदेत २३ मार्चला प्रश्नोत्तरांच्या तासात आ. प्रा राम शिंदे यांनी विविध प्रश्ने उपस्थित केले. राज्यातील कृषी (Agriculture) सहाय्यकांचे पदनामाबाबत महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेकडून सातत्याने सरकारकडे मागणी होत होती.
हिंदोनबर्गचा आणखी एक स्फोट, गौतम अदानी लक्ष्यावर नव्हे तर या व्यावसायिकांनी, कंपनीचे शेअर्स.
या मागणीची दखल घेत विधानपरिषदेच्या आजच्या कामकाजात आ. शिंदे (Ram shinde) यांनी कृषी सहाय्यकांच्या पदनामाबाबतचा उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राज्याचे कृषि मंत्री अब्दूल सत्तार यांनी उत्तर देताना म्हणाले की, कृषी सहायक “ या पदनामात बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी “ असा बदल करण्याचा निर्णय येत्या १५ दिवसात घेण्यात येईल. कृषिमंत्र्यांच्या या अश्वासनामुळे राज्यातील हजारो कृषि (Agriculture) सहाय्यकांचा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न निकाली निघाला आहे. यामुळे राज्यातील कृषि सहाय्यकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.