कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले … मोदीजींच्या कामावर

0 223
नवी मुंबई –  नुकताच एका मुलाखतींमध्ये केलेल्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री कंगना रानौत (Actress Kangana Ranaut) वर चारही बाजूने टीका होत आहे. अनेक राजकीय पक्षांनी तिला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार परत घेण्याची मागणी देखील केली आहे. अभिनेत्री कंगनावर सोशल मीडियावर (Social media) जोरदार टीका होत आहे. या सर्व प्रकरणावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.(Chandrakant Patil’s reaction to Kangana’s ‘that’ statement, said … on Modiji’s work)
पुण्यातील एसपी महाविद्यालयात एका कार्यक्रमाकरिता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कंगना रणौतच्या वादग्रस्त विधानाबाबत विचारले होते. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
Related Posts
1 of 1,518
ते म्हणाले कंगना रणौत यांच्या भावना काय आहेत. त्या मला माहिती नाहीत, पण त्यांच वाक्य पूर्णपणे चुकीचे आहे. अशा प्रकारे देशाच्या स्वातंत्र्यावर निगेटिव्ह टिप्पणी करणे, याची कोणालाही परवानगी नाही. पण २०१४ मध्ये नेरेंद्र मोदी आल्यापासून जो काही स्वातंत्र्याचा अनुभव मिळत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व सामान्यांना दोन वेळेच जेवण मिळत नाही, असा एकही माणूस दिसत नाही. १०५  रुपयात ३५ किलो धान्य, घरे, टॉयलेट अशी मोठी कामांची यादी आहे. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा अनुभव, २०१४  पासून लोकांना मिळायला लागल्याच विधान हे मोदीजींच्या कामावर खुश होऊन म्हणणे योग्य आहे. पण १९४७ मधील स्वातंत्र्यावर त्यांना (कंगनाला) टीका करण्याचा अधिकार नसल्याची भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली. (Chandrakant Patil’s reaction to Kangana’s ‘that’ statement, said … on Modiji’s work)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: