चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता – जयंत पाटील

0 335

नवी मुंबई –  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद (Aurangabad) येथे केलेल्या आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी या विधानानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या त्या विधानाचा वेगवेगळा अर्थ लावला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा हा विधान केला तेव्हा व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) व इतर काही भाजपा नेते उपस्थित होते.

या सर्व घडामोडीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक मोठं विधान करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेने( Shiv Sena) त येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी सूचक विधान केलं असावं असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली आहे.

चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजपा सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेत काही लोक येण्याची शक्यता असून तशी गडबड मला दोन दिवसात दिसत आहे. त्यामुळे हे दोन नेते शिवसेनेत येत असावेत. शिवसेनेत आल्याशिवाय त्यांना आजी होता येणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येणार – चंद्रकांत पाटील ,ते दोन नेते कोण?

Related Posts
1 of 1,517

जयंत पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचं सांगताना कोणतेही मतभेद नसल्याचं म्हटलं आहे. तसंच भाजपा नेते दोन वर्षांपासून असंच बोलत असून त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

हे पण पहा –राष्ट्रवादी पुन्हा… नामदेव राऊतांचा भाजपला रामराम…

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: