DNA मराठी

चांडगाव सेवा सोसायटी निवडणूक राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध..!

0 142
Chandgaon Seva Society Election without any opposition under the leadership of Rajendra Mhaske ..!

 

श्रीगोंदा – तालुक्यातील चांडगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. हि निवडणूक तालुक्याचे जेष्ठ नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली.या निवडणुकीत तेरा जागेंसाठी जवळपास एकवीस अर्ज दाखल झाले होते.त्यापैकी सहा उमेदवारांनी राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून आपले उमेदवारी अर्ज माघार घेऊन हि निवडणूक बिनविरोध पार पडली.

 

Related Posts
1 of 2,482
नवनिर्वाचित बिनविरोध संचालक म्हणून राजेंद्र भाऊ म्हस्के,जंजिरे शोभा चंद बापू, म्हस्के महेंद्र पोपट, म्हस्के नंदा नानाभाऊ, म्हस्के रूपचंद बापू, म्हस्के सिंधूबाई दत्तात्रय,चाकणे पंढरीनाथ तात्या, म्हस्के बाळू आप्पा, चव्हाण संजय साहेबराव,खामकर अनिता शिवाजी,चाकणे कविता भाऊसाहेब,लोंढे बाळासाहेब मधूकर यांची बिनविरोध निवड झाली.या नवनिर्वाचित संचालक मंडळाचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले व  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.हि निवडणूक बिनविरोध करून सलग पाचव्यांदा म्हस्के गटाने चांडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.

 

 

तालुक्याचे जेष्ठ नेते राजेंद्र म्हस्के यांनी आपला राजकारणातील मुरब्बी पणा दाखवून सभासदांच्या हितासाठी जुन्या व नव्यांचा मेळ घालून हि निवडणूक बिनविरोध केली.त्याबद्दल तालुक्यातील सर्व नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: