राज्यातील ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पाऊसाची शक्यता

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे रत्नागिरीत पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासूनच रत्नागिरीत सूर्याचं दर्शन झाले नाही. किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने कोकणात अवकाळी पाऊस (Rain) पडण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, कोकणात ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. रत्नागिरीत आज सकाळपासून सूर्य ढगामागे लपल्याने रत्नागिरीकरांना उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. (Chance of unseasonal rains again in this part of the state)