राज्यात येणाऱ्या आणखी काही दिवस मुसळधार पाऊसाची शक्यता

0 161

पुणे –    मागच्या दोन आठवड्यापासून राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पाऊस ( Torrential Rains ) येणाऱ्या तीन ते चार दिवस सक्रिय राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दोन दिवसांच्या कालावधीत कोकणाच्या काही भागांत अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.15 सप्टेंबर पासून पावसाचा जोर मंदावणार असून,16 सप्टेंबर पासून उघडीप राहील. त्यानंतर परत एकदा 18 ते 19 सप्टेंबरपासून पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे.

राज्यात मागच्या आठवड्यापासून जवळपास संपूर्ण राज्यात पाऊस होत आहे. कोकणात काही भागांत विशेषत: रायगड, मुंबई, पालघर, ठाणे व रत्नागिरी या जिल्ह्यांतील काही भागांत अतिवृष्टी, तर उर्वरित भागात मुसळधार पाऊस होत आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर आहे. तर नाशिक भागातही पाऊस वाढला आहे. मराठवाड्यातील बहुतांश भाग आणि विदर्भात पाऊस जोरात आहे.

उघडपणे मावा विक्री चालू, कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची नागरिकांची मागणी

Related Posts
1 of 1,308

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार ओडिशाच्या किनारपट्टीवरील उत्तर भागाकडे तयार झालेले अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र ओडिशाच्या अंतर्गत असलेल्या उत्तरेकडे सरकले आहे.सध्या हे क्षेत्र दक्षिण-पूर्व ओडिशाच्या किनोजहारागड पासून 50 किलोमीटर तर चंदबेलीपासून 100 किलोमीटरवर आहे. पुढील 48 तासांत या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन ते उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश पार करणार आहे. त्यानंतरच्या 12 तासात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होईल.

हे पण पहा –किरीट सोमय्या यांना देणार करारा जवाब | मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलवली तातडीची पत्रकार परिषद

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: