पुढच्या पाच दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; IMD ने दिला मोठा इशारा

0 260
Attendance in the district including Nagar city due to unseasonal rain with thunder ..

 

मुंबई – देशातील बहुतेक भागात मागच्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट असून नागरिक या लाटेमुळे त्रस्त झाले आहे. तर काही भागात पावसाने हजरी लावत नागरिकांना दिलासा दिलाय यातच आता पुढच्या पाच दिवस देशातील काही राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्येकडील भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच आसाम आणि मेघालयमध्ये 2 जून ते 4 जून या कालावधीत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 2 जूनपर्यंत आणि अरुणाचल प्रदेशात 4 जून दरम्यान मुसळधार पाऊस होईल. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

 

 

आज हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. आज उत्तराखंड, महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतात मान्सून पुढे सरकत आहे, मात्र त्याचा वेग काहीसा कमी झाला आहे. गेल्या 24 तासांत लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. आयएमडीनुसार, नैऋत्य मान्सूनने संपूर्ण केरळ व्यापलं आहे. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काहीं भागात आणि दक्षिण-पश्चिमच्या अनेक भागात मान्सून पुढे सरकला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांच्या प्रभावामुळे केरळ, लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Related Posts
1 of 2,125

दरम्यान, पुढील पाच दिवसांत कर्नाटकात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी इथंही पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला आहे, ज्यामुळे पुढील तीन दिवसांत या राज्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.

 

 

पश्चिम राजस्थानपासून हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशात हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर गेल्या 24 तासांत यापैकी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: