DNA मराठी

‘या’ 12 जिल्हयात विजांच्या कडकडाटा वादळी पावसाची शक्यता; IMD ने दिला इशारा

0 327
Heavy rains for next 5 days in 'this' districts; IMD warns

 

मुंबई – भारतीय हवामान विभागाकडून (IMD) राज्यातील भागात मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच बरोबर काही भागात उष्णतेची लाट असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. त्याच बरोबर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 19 ते 21 मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

 

Related Posts
1 of 2,477

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी 19 मे ते 21 मे दरम्यान विजांच्या कडकडाटा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अकोला, यवतमाळ, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान वर्धा शहरात काल सर्वाधिक उष्ण तापमान 45 अंश सेल्सिअस होते.

 

राज्यात मान्सून सक्रीय होण्यासाठी 12 ते 15 जून उजाडण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख 11 जून असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून पूर्व हवामान तयार होत असल्याने पावसाची शक्यता आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: