DNA मराठी

राज्यात तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

0 345
Chance of rain with three days of thunderstorms in the state

 

मुंबई –  काही दिवसांतच संपूर्ण देशात मॉन्सूनचा (Monsoon)आगमन होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात भारतात मॉन्सूनची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही भागात पुढील तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

 

 

बुधवारी (२५ मे) विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता जूनच्या पहिल्या आठवडय़ात र्नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यानंतर कोकणमार्गे महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात हे वारे पोहोचतील.

 

 

Related Posts
1 of 2,468

गुरुवारी (२६ मे) विदर्भातील गोंदिया जिल्हा सोडून उर्वरित सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, तर शुक्रवारी (२७ मे) विदर्भातील भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात पुढील तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते उत्तर पूर्व अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: