
अहमदनगरसह राज्यातील अनेक वादळी पावसाची शक्यता…..
मुंबई : राज्यातील मध्य महाराष्ट्रात नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. तर मराठवाडामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बहुंतांश जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या विविध भागात वादळी पाऊस गारपिटीने हजेरी लावली आहे.
ahmednagar crime: दारुच्या नशेतूनच पिंपळगाव रोठात हत्याकांड…
कमाल तापमानात काहीशी घट होऊन उकाड्यात वाढ झाली आहे. महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कमाल तापमानात घट होणार असली तरी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.