
श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील संघमित्र तरुण मंडळ राजपुर यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar Jayanti) यांची १३१ वी जयंती उत्साहात व सामाजिक उपक्रमातून साजरी केली त्यांच्या या उपक्रमाचे गावातून व पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. यावेळी गावातील पोलीस दलातील महीला व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्यांचा शाल, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यामधे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या शुभांगी रामदास पवार,मीरा पांडुरंग व्यवहारे, चित्रा सर्जेराव वीर,सुरेखा सुभाष कोरडे यांचा सन्मान करण्यात आला तसेच पंडित दगडू रणदिवे यांनी आपल्या स्वतःच्या मालकीची शाळेसाठी जागा विनामोबदला दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला व सामाजिक कामाबद्दल पत्रकार अमोल बोरगे यांचाही सन्मान संघमित्र तरुण मंडळातर्फे करण्यात आला.