अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

0 145
Police war party with accused arrested in warrant; But the wrist of the officer is on the end

कर्जत- कर्जत पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी विशेष कामगिरी करत अल्पवयीन मुलगी हीचावर  अत्याचारांच्या गुन्ह्यात दुसरी जन्मठेपेची शिक्षा.

सदर गुन्ह्यातील पीडित ही 14 वर्षाची असून ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरडगाव येथे आठवी इयत्ता मध्ये शिक्षण घेत होती. पीडितेच्या राहत्या घरापासून थोड्या अंतरावर आरोपी रामदास रोहिदास मोरे (राहणार हिरडगाव तालुका श्रीगोंदा) हा त्याची पत्नी मुलाबाळांसह राहावयास असून गुन्हा दाखल होण्यापूर्वी काही दिवसापूर्वी पीडित फिर्यादीची आई मजुरीचे कामासाठी गेली असता दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.00 च्या सुमारास मोरे याने पीडितेस राहते घरी बोलावून घेऊन पीडितेची आंघोळ करीत असताना त्याचे मोबाईल मध्ये काढलेली व्हिडिओ शूटिंग दाखवून मी सांगेल त्याप्रमाणे करावयाचे नाहीतर तुझी व्हिडिओ शूटिंग सगळीकडे पाठवील अशी धमकी दिली.

त्यानंतर याचेच दिवसांनी फिर्यादीची आई मजुरीचे कामावर गेल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आरोपी रामदास मोरे यांनी पीडितेला घरामध्ये बोलावून पीडितेच्या आंघोळ करताना काढलेल्या व्हिडिओ शूटिंग सगळीकडे पाठविला अशी धमकी देत पीडितेवर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केले होते त्यामुळे पीडितेला दिवस गेले होते.

सदर पीडितेच्या वरील प्रमाणे फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशन नंबर गुरं 2054/ 2020 भादवी 376 (2)( i)(n),354 (c) सह बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3,4, 8,7 प्रमाणे दिनांक 13 /12/ 2020 रोजी बाजूस नमूद कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सदर आरोपी विरुद्ध माननीय जिल्हा सत्र न्यायालय श्रीगोंदा येथे याचा गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे हस्तगत करून गुणात्मक दोषारोप सादर करणे केले होते .सदर गुन्ह्यात आरोपी तास भा द वि 376 अंतर्गत जन्मठेप पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, तसेच भा दं.वि506 प्रमाणे एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच दोन हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.

Related Posts
1 of 2,326

सदरच्या दोन्ही शिक्षा ह्या आरोपी ने एकाच वेळी भोगायचं आहेत तसेच पीडितेला नुकसानभरपाई मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात यावे असून नमूद करण्यात आलेले आहे.
सदरचा महत्वपूर्ण निकाल श्रीगोंदा येथील माननीय सत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम एस शेख यांनी दिलेला आहे.

सदर गुन्ह्याचा सखोल तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव कर्जत विभाग, सपोनि पाटील, पोलीस अंमलदार नयुम पठाण, संतोष साबळे यांनी केला असून कोर्ट पैरवी म्हणून पोलीस अंमलदार आशा खामकर, गणेश ठोंबरे यांनी उत्कृष्ट कामकाज पाहिले आहे.

सरकारी अभियोक्ता म्हणून कापसे मॅडम यांनी कामकाज पाहिले

पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची तपासामध्ये तांत्रिक व वैद्यकीय पुरावा हस्तगत करण्यावर ती अधिक भर देऊन तांत्रिक व वैद्यकीय पुराव्याची साखळी तयार करून यापूर्वी डिसेंबर महिन्यात कर्जत पोलिस स्टेशन वर नंबर 507 /2021 भा द वि 376 ,अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम अंतर्गत गुन्ह्यातील आरोपी नामे मोहन जयसिंग निंबाळकर (वय 55 वर्षे राहणार पाटेवाडी तालुका कर्जत) यास पाच महिन्याच्या आत जन्मठेपेची शिक्षा लावली आहे तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरुनं 2054 / 2020 या गुन्ह्यातील आरोपी नामे रामदास रोहिदास मोरे वय 35 वर्षे हिरडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आज रोजी पुन्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली असून दोन्ही गुन्ह्यातील आरोपी त्यांना जन्मठेपेच्या शिक्षा पर्यंत पोहोचवले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: