शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याने लाभ नाकारल्यास प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना मिळणार लाभ – धनंजय मुंडे

0 11

नवी मुंबई –   सामाजिक न्याय विभागातंर्गत परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या नियमात अंशतः बदल करण्यात आला असून, यानुसार आता सदर योजनेचे लाभार्थी म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव लाभ नाकारल्यास निवड सुचीतील प्रतिक्षा यादीतील पुढील उमेदवारांचा विचार करून निवड समिती त्यांना लाभ मिळवून देईल असा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय कार्यासन अधिकारी चंद्रकांत वडे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे.

मागच्या २४ तासांत राज्यात १५ हजार ८१७ नवीन कोरोनाबंधित रुग्णांची नोंद

परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्चशिक्षण घेत असलेल्या ७५ विद्यार्थ्यांना विशेष निवड प्रक्रियेद्वारे या योजनेचा लाभ देण्यात येतो. केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाची देखील याच प्रकारची शिष्यवृत्ती योजना आहे. बऱ्याचदा विद्यार्थी दोन्हीही योजनांच्या लाभासाठी अर्ज करतात परंतु निवड झाल्यानंतर नियमानुसार त्यांना कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येतो. अशा वेळी बऱ्याचदा विद्यार्थी केंद्रसरकारच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतात. २००३-०४ पासून सुरू असलेल्या या योजनेत लागू असलेल्या नियमावलीनुसार राज्य सरकारच्या योजनेसाठी अंतिम निवड झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याने ऐन वेळी अशा कारणांनी लाभ नाकारल्यास ती जागा रिक्त राहत असे. पर्यायाने प्रतिक्षा यादीतीतल उमेदवारदेखील या लाभांपासून वंचित राहत होते.

खोली क्रमांक 109 आणि ते अटक होण्यापूर्वीचे पाच तास ……. 

Related Posts
1 of 1,290

२०१९-२० या शैक्षणिक वर्षात रिक्त झालेल्या जागांवर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची निवड करावी अशी मागणी करत काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु नियमावलीत तशी तरतूद नसल्याने न्यायालयाने प्रकरण निकाली काढले. मात्र विद्यार्थ्यांचे हित व मागणीचा विचार करत मंत्री धनंजय मुंडे यांनी सदर योजनेच्या नियमात अंशतः बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याने अंतिम निवड झाल्यानंतर जर योजनेचा लाभ नाकारला तर त्याजागी निवड सूचीतील प्रतिक्षा यादीतील पात्र उमेदवारास गुणानुक्रमे या योजनेचा लाभ देण्यात येईल व योजनेचा कोटा १०० टक्के पूर्ण करण्यात येणार आहे.

पत्रकार बाळ बोठेचा नवीन लुक आपण पाहिला का …………?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: