कर्जत तालुका पत्रकार संघ व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  कर्जत शहरात कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी मोहीम  

0 10

अहमदनगर –  कर्जत तालुका पत्रकार संघ व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज कर्जत शहरात कोरोना संदर्भात जनजागृती करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली यावेळी सर्वांनी कोरोना पासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली.  सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. तसेच काही रुग्ण मयत झाले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी कर्जत तालुका पत्रकार संघ व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज कर्जत शहरात जनजागृती अभियान राबविण्यात आले. मेन रोड,  छत्रपती शिवाजी महाराज चौक, कापड बाजार, युनियन बँक, बाजारतळ, म्हसोबा गेट, कोर्ट रोड या भागात फिरून व्यापारी बांधव,  ग्राहक, पादचारी, दुचाकी व चारचाकी वाहन चालक आदीना कोरोना बाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. सोशल डिस्टिंक्शनचे पालन करा, मास्कचा वापर करा, सॅनिटाइजरचा वापर करा असे आवाहन करण्यात आले.
आज कोरोना संदर्भात उपाययोजना करण्यासाठी सुचना आहेत, उद्या पासुन जो व्यक्ती कोरोनाचे नियम पाळणार नाही अशांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला.

शरद पवारांच्या नाराजीवर संजय राठोड यांनी अशी दिली आपली प्रतिक्रिया…

Related Posts
1 of 1,291

या अभियानात कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे, उपाध्यक्ष आशिष बोरा, सचिव निलेश दिवटे, गणेश जेवरे, मच्छिंद्र अनारसे, सुभाष माळवे, नय्युम पठाण, अफरोज पठाण,  वाहतूक शाखेचे सहायक फौजदार बाळासाहेब यादव,  पोलीस कर्मचारी गोवर्धन कदम, ईश्वर नरुटे, बळीराम काकडे आदी सहभागी झाले होते. कर्जत शहरातील पत्रकार  व पोलीसांनी संयुक्तपणे राबविलेल्या या उपक्रमाचे कर्जतकरांनी स्वागत केला आहे .

मोदीसाहेब ‘मन की बात’ मधून किंवा भाषणात चांगलं – चांगलं बोलतात परंतु कृती काहीच करत नाहीत  –   सुप्रिया सुळे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: