DNA मराठी

Ahmednagar news:- पैसे घेऊन अश्वीलकृत्ये करण्यास जागा उपलब्ध करून देणार्या कँफेंवर कारवाई

गुन्हेशोध पथकाच्या अंमलदारांनी सायबर कॅफे यांची अचानक तपासणी केली असता हा प्रकार आढळून आला.

0 595

अहमदनगर: तरुण-तरुणींना अश्लील हावभाव अथवा अश्लील कृत्ये करण्यास सुलभता मिळावी तसेच अशी कृत्ये करण्यास त्यांना जागा उपलब्ध करून देऊन त्याबदल्यात तासाप्रमाणे पैसे घेणाऱ्या नगर शहरातील तीन सायबर कॅफे ( Action on camps) शॉपवर कारवाई करण्यात आली आहे.

सत्तेच्या नशेत नेत्यांकडून गैर कृत्यांचे प्रकार वाढ, राजकारणात डागाळलेली नेते, तरीही मी तो नव्हेच.

नगर शहर परिसरातील चाणक्य चौकातील रिच किंग कॅफे, भोसले आखाडा येथील बेला कॅफे, चाणक्य चौकातील कॅरेमेला कॅफे या तीन कॅफेंवर ही कारवाई करण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच नगर शहर परिसरातील नागरिकांकडून याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाच्या अंमलदारांनी सायबर कॅफे Action on camps यांची अचानक तपासणी केली असता हा प्रकार आढळून आला. तसेच या कॅफेवर विना परवाना खाद्य गृहातून खाद्य पदार्थांची ग्राहकांना विक्री करताना आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Related Posts
1 of 2,492

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पो. हे. कॉ. सतीश भांड, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, श्रीकांत खताडे यांच्या पथकाने केली आहे.
या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई मोहिम अशीच राबवण्याची मागणी होत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: