आता ‘ती’ Caller Tune ऐकू येणार नाही; सरकार घेणार मोठा निर्णय

0 349
Caller Tune will no longer be heard; The government will take a big decision
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
 
 मुंबई –  देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवल्यानंतर देशातील सर्वसामान्य जनतेला जागरूक करण्यासाठी मोबाईल कॉलर ट्यूनचा वापरे करण्यात येत होता. (Caller Tune) या कॉलर ट्यूनद्वारे कोरोनाबद्दल माहिती देण्यात येत होती. मात्र आता समोर आलेल्या माहिती नुसार सरकार लवकरच ही कॉलर ट्यून हटवणार आहे. रकारकडे अनेकांनी ही कॉलर ट्यून बंद करण्याबाबत अर्ज देखील केला होता. (Caller Tune will no longer be heard; The government will take a big decision)
Related Posts
1 of 2,376

ज्या उद्देशाने कोरोना कॉलर ट्यून सर्व मोबाइलवर वाजवण्यात येत होती, त्याचा उद्देश आता पूर्ण झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाच्या कॉलला विलंब होत असल्याचं या अर्जात सांगण्यात आलं आहे. या कॉलर ट्यूनमुळे आपत्कालीन काळात महत्त्वाचे कॉल्स होल्ड होण्याचा, कॉलला विलंब होण्याचा धोका असतो. यामुळे TSP नेटवर्कवरील भार वाढतो आणि कॉल कनेक्शनला उशीर होतो. त्यामुळेच आता कोरोना परिस्थिती सुधारत असताना ही कॉलर ट्यून काढून टाकण्याची मागणी होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दूरसंचार विभागाने (DOT) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून या कॉलआधीच्या घोषणा, कॉलर ट्यून काढून टाकण्याची विनंती केली आहे.

देशात कोरोना परिस्थितीत झालेली सुधारणा लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाकडून आता ही ऑडिओ क्लिप काढून टाकण्यावर विचार सुरू आहे. परंतु या कॉलर ट्यूनशिवाय कोरोनाविरोधातील इतर सुरक्षेच्या उपायांबद्दल जगजागृती करण्यासाठी इतर उपाययोजना सुरू राहतील अशी माहिती समोर आली आहे.

टेलिकॉम सर्विस प्रोव्हायडरकडून लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी, साथीच्या आजारादरम्यान घ्यायची काळजी, लसीकरण याबाबत माहिती देण्यासाठी कॉलआधी कोरोनासंबंधित कॉलर ट्यून वाजवली जात होती. जवळपास 21 महिने ही कॉलर ट्यून सुरू आहे. या कॉलरचा ट्यूनचा लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा उद्देशही पूर्ण झाला असून आता याचा वापर बंद करण्याबाबत दूरसंचार विभागाने आरोग्य मंत्रालयाला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.(Caller Tune will no longer be heard; The government will take a big decision)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: