
कोल्हापुरात 14व्या फेरीनंतर काँग्रेसच्या उमेदवार 12 हजार 266 मतांनी आघाडीवर
कोल्हापुरात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव 14व्या फेरीच्या मतमोजणीत 12 हजार 266 मतांनी आघाडीवर आहेत. 14व्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री यांना 3 हजार 756 तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना 2 हजार 669 मते मिळाली.
आसनसोलमधून शत्रुघ्न सिन्हा आघाडीवर
बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघात शत्रुघ्न सिन्हा आघाडीवर आहेत. शत्रुघ्न सिन्हा इतर उमेदवारांपेक्षा 91 हजार मतांनी आघाडीवर आहेत.