अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नाचगाण्या साठी भाग पाडणाऱ्या महिलेला अटक

0 705

अहमदनगर –  शहरातील केडगाव (Kedgaon) येथे रहात असलेल्या एका अल्पवयीन मुली (Minor girls) चे अपहरण (Kidnapping) करून तिच्या इच्छेविरुद्ध तिला नाचगाण्या साठी भाग पाडणाऱ्या आरोपी महिलेला जामखेड येथून कोतवाली पोलिसांनी अटक केली असुन पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका देखील केली आहे. पोलिसांनी या कारवाईत नंदिनी बाळासाहेब काळापहाड या महिलेला अटक केली आहे. आरोपी महिलेला न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे .

या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी की अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात राहणारी 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही त्या ठिकाणी थांबली असताना जामखेड येथील कला केंद्र मध्ये काम करणाऱ्या एका महिलेने तिचे अपहरण केले होते.

यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . संबंधित मुलीच्या घरच्यांनी तिचा बऱ्याच ठिकाणी शोध घेतला होता पण ती मिळून आलेली नव्हती , त्या अल्पवयीन मुलीला जामखेड येथे गेल्यावर तिला ज्या प्रकारची अमानुषपणे वागणूक देण्यात येत होती तिला ती कंटाळली होती, तिने आजूबाजूच्या नागरिकांशी संपर्क करून तिने आपल्या घरी दुसऱ्याच्या फोनवरून फोन करून मला जामखेड येथे आणलेले आहे व मी या ठिकाणी आहे व मला या ठिकाणी खूप त्रास दिला जात आहे माझी सुटका करा असे सांगितले.

ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ जामखेड या ठिकाणी काल रात्री पोलिसांचे पथक पाठवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे व गणेश धोत्रे,नकुल टिपरे,आदी सह पोलिस पथक जामखेड येथे संबंधित कला केंद्राच्या ठिकाणी गेले व त्या ठिकाणाहून त्यांना ती अल्पवयीन मुलगी आढळून आली.

Related Posts
1 of 1,487

ग्रामसेवक गवांदे आत्महत्या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…

पोलिसांनी त्यांची सुखरूप सुटका करून तिला नगर येथे आणले व नातेवाईकाच्या हवाली केले ज्या महिलेने तिला पळून नेले होते त्या महिलेला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास कोतवाली पोलिस करत आहे.

हे पण पहा – श्रीगोंदा तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान…

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: