पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 2 नोव्हेंबरला निकाल – निवडणूक आयोग

0 266

नवी दिल्ली –   विधानसभेच्या ३० (Legislative Assembly) आणि लोकसभेच्या (Lok Sabha) ३ मतदारसंघांत ३० ऑक्टोबर (October 30)  रोजी पोटनिवडणुका (By-election) होतील, असे निवडणूक आयोगा (Election Commission) ने मंगळवारी जाहीर केले. त्यात नांदेड जिल्ह्यातील देगलुर-बिलोली मतदारसंघाचाही समावेश आहे. काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे ती जागा रिक्त झाली. कोरोनाने अंतापूरकर यांचे एप्रिलमध्ये निधन झाले होते.

जेथील पोटनिवडणुका जाहीर झाल्या, त्यात खांडवा (मध्य प्रदेश), मंडी (हिमाचल प्रदेश) तसेच दादरा, नगरहवेली आणि दीव व दमण अशा तीन लोकसभा जागा आहेत. याशिवाय आंध्र प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र, मिझोरम, नागालँड व तेलंगणा या राज्यातील प्रत्येकी एक विधानसभा मतदारसंघात ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होईल. कर्नाटक, बिहार व राजस्थानमधील प्रत्येकी दोन, हिमाचल प्रदेश, मेघालय व मध्य प्रदेशातील प्रत्येकी तीन आणि पश्चिम बंगालमधील चार व आसाममधील पाच ठिकाणीही ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने या पोटनिवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यापैकी भवानीपूर (प. बंगाल) सह चार विधानसभा जागांवर आधी पोटनिवडणूक जाहीर झाली. तिथे बुधवारी मतदान होत असून, ३ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.

भवानीपूरमधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रिंगणात असून, भाजपच्या प्रियांका टिबरेवाल यांच्याशी त्यांचा सामना होईल. सार्वत्रिक निवडणुकांत भाजपचे सुवेंदु अधिकारी यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. तरीही मुख्यमंत्री झालेल्या ममता यांना सहा महिन्यांत निवडून येणे आवश्यक आहे. त्यामुळे भवानीपूरच्या तृणमूलच्या आमदाराने राजीनामा दिला. त्या रिक्त जागेवर त्या उभ्या आहेत. भवानीपूरमधून त्या दोनदा विजयी झाल्या होत्या.

हे पण पहा  –औरंगाबाद : पावसाच्या पाण्यात दुकानं गेली वाहून…

असा असणार कार्यक्रम

अधिसूचना: १ ऑक्टोबर

Related Posts
1 of 1,518

अर्ज भरण्याची मुदत : ८ ऑक्टोबर

अर्ज छाननी : ११ ऑक्टोबर

माघारीची मुदत : १३ ऑक्टोबर

मतदान : ३० ऑक्टोबर

मतमोजणी : २ नोव्हेंबर

 ‘गुलाब’ नंतर आता राज्यात धडकणार ‘ चक्रीवादळ, जाणुन घ्या संपूर्ण माहिती

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: