तर मात्र आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल – उद्धव ठाकरे

0 448

नवी मुंबई –   राज्यात कोरोना विषाणूच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता जवळपास कमी झाला असून राज्यसरकारने लावलेल्या अनेक निर्बंध शिथिल केले असले तरी आता पर्यंत राज्यातून कोरोना विषाणूचा धोका टाळलेला नाही. यातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटे बद्दल महत्वाचे विधान केला आहे.  (But you have to lockdown – Uddhav Thackeray)

तिसऱ्या लाटेबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणले कि  अजूनही करोनाचं संकट टळलेलं नाही. ते आपल्याला टाळायचं आहे. आपण जर अशाच पद्धतीने गर्दी करत राहिलो, करोनाबाबतचे नियम पाळले नाही, तर करोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधी येईल. गेल्या वेळी आपल्याकडे असलेल्या ऑक्सिजनच्या साठ्यात विशेष काही वाढ झालेली नाही. त्यामुळे रुग्ण वाढले आणि असलेल्या साठ्यापर्यंत पोहोचलो, तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल., असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोविड केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सूचना दिल्या आहेत.

हे पण पहा – नगर पोलिसांची राज्यात प्रथम ई-टपाल(E-TAPAL)कार्यप्रणाली सुरु

 शुक्रवारी रोजी राज्यात ६ हजार ३८४ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ४ हजार ३६५ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, १०५ करोनाबाधित रूग्णांचा आज मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,२१,३०५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.९७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,१५,९३५ झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १३५६७२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. (But you have to lockdown – Uddhav Thackeray)

बैठकीत सोनिया गांधींना उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं? संजय राऊत म्हणतात ……

Related Posts
1 of 1,635
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: