शहरात किरकोळ वादातून व्यवसायिकाला बॅट व स्टंपने मारहाण; गुन्हा दाखल

0 364
Businessman beaten with bat and stump in minor dispute in the city; Filed a crime
प्रतिनिधी DNA मराठी टीम
 

अहमदनगर –  अहमदनगर शहरातील (Ahmednagar) सर्जेपुरा (Sarjepura) परिसरात एका व्यवसायिकाला (Businessman) किरकोळ कारणातून  लाकडी बॅट व स्टंप (Bat and stump) ने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात तीन जणांना विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अजीम ऊर्फ आज्जू वजीर शेख (रा. फुलार गल्ली, माळीवाडा, अहमदनगर) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसीम गुलाम सय्यद (रा. सर्जेपुरा, अहमदनगर) व त्याचे दोन अनोळखी मित्र (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Businessman beaten with bat and stump in minor dispute in the city; Filed a crime)

Related Posts
1 of 2,427
फिर्यादी शेख हे सर्जेपुरा येथील भाकरे गल्लीमधील दुकानात गेले असता त्याठिकाणी वसीम सय्यद व त्याचे दोन मित्र आले आणि काही एक कारण नसताना शिवीगाळ करून त्यांनी फिर्यादीला  धक्काबुक्की केली. त्यानंतर फिर्यादी सर्जेपुरा येथील हरीओम मोटर्स येथे थांबले असता वसीम सय्यद व त्याच्या दोन मित्रांनी फिर्यादीला लाकडी बॅट व स्टंपने मारहाण केली.
 या मारहाणीत फिर्यादीच्या नाकातोंडातून रक्त आल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी उपचार घेवून तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Businessman beaten with bat and stump in minor dispute in the city; Filed a crime)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: