जिल्ह्यात १२वीच्या पेपरला निघालेले भाऊ बहिणीचा अपघातात मृत्यू

0 799
Brother and sister died in an accident in the district

 श्रीगोंदा :- श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील निमगाव खलू येथून दौंड येथे १२ विचा पेपर देण्यासाठी लहान भावासोबत दुचाकीवरून जाणाऱ्या भाऊ बहिणीचा अज्ञात पिकअप (Pickup) ने उडविल्याने दोघा भाऊ बहिणीचा (Brother and sister) जागीच मृत्यू झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू येथील शिंदे कुटुंब शेती करून आपली उपजीविका भागवत पोटाला चिमटा घेत जे आपल्याला लहानपणी मिळाले नाही ते सर्व आपल्या मुलांना मिळावे यासाठी अहोरात्र कष्ट करत होते . त्यातच त्यांची मोठी मुलगी अनुष्का गणेश शिंदे हिचे दौंड मेमोरियल या शाळेत शिक्षण घेत होती.  सध्या १२ वीचे पेपर चालू आहेत त्या पेपरसाठी सकाळी आपला भाऊ आदित्य गणेश शिंदे  यांच्यासोबत निमगाव खलू वरून दुचाकीवर सकाळी नऊ च्या सुमारास जात असताना पिकअपने समोरून दिलेल्या जोरदार धडकेत अपघात (Accident) होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दौंड येथील भीमा नदीच्या पुलाजवळील जुन्या टोलनाक्यानजीक आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

dna marathi

 यामध्ये अनुष्का गणेश शिंदे (वय १६) व आदित्य गणेश शिंदे (वय १४ रा निमगाव खलु,ता श्रीगोंदा) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या बहीण भावाची नावे आहेत.  या मुलांचे वडील पेंटर काम व शेती  करत असल्याची माहिती मिळाली आहे.  अतिशय गरीब कुटुंबातील या सख्या बहीण भावाचा असा करून अंत झाल्यामुळे निमगाव सह परिसरावर शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.

 

Related Posts
1 of 2,177

dna marathi

 आज सकाळी हे दोघे बहीण भाऊ दौंड येथे शाळेत जाण्यासाठी निमगाव खलु येथून दौंडकडे जात असताना हॉटेल धनश्री समोर जुन्या टोल नाक्याजवळ एका टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या नादात दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव पिकअपने या दोघा बहीण भावाना समोरून जोराची धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे या दोन्ही बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: