युट्यूब वरून हॅकिंग शिकल्यानंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलाने बापाकडे मागितली 10 कोटींची खंडणी

0 9

गाजियाबाद –  उत्तरप्रदेश मधील गाजियाबाद या शहरामधील एका पाचवी मध्ये शिकणाऱ्या मुलाने युट्यूब वरून हॅकिंग कसे करतात याचे धडे घेतले आणि  त्यानंतर स्वत:च्या वडिलांना  ई-मेल   पाठवून तब्बल १०  कोटी रूपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि सुरुवातीला युट्यूब वरून हॅकिंग कसे करतात हे  शिकल्यानंतर त्या मुलाने आपल्या वडिलांना एक धमकीचा ईमेल पाठवला . आलेल्या ईमेलमुळे घाबरून त्या मुलाच्या वडिलांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली. त्या तक्रारीत त्यांनी म्हटलं  की ईमेल पाठवणाऱ्याने त्यांच्याकडे १० कोटींची खंडणी मागितली आहे. खंडणीची रक्कम दिली नाही तर  माझे अश्लील फोटो व्हायरल करण्यात येतील अशी धमकी ई-मेल पाठवणाऱ्याने दिली आहे . मुलाच्या वडीलानी आपल्या तक्रारीत पुढे म्हटले कि हॅकर त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देत आहे.

 

                                      दिल्ली हिंसेमागे भाजप नेत्याचाही हात, चौकशी करा- सुब्रमण्यम स्वामी

या  तक्राराची पोलिसांनी गंभीर दखल घेत  या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे विभागाकडे सोपवला . पोलिसांनी ई-मेल कुठून आला आहे हे शोधून काढण्यासाठी आयपी ऍड्रेस  शोधण्यास सुरुवात केली असता हा आयपी ऍड्रेस तक्रार देणाऱ्याच्या घरचा असल्याची बाब पोलिसानं समोर आली . यानंतर पोलिसांनी तक्रार देणाऱ्याच्या  घरची तपासणी करत असताना  पोलिसांना त्यांच्या ११ वर्षांच्या मुलावर संशय आला . जेव्हा पोलिसांनी तक्रारदेणाऱ्या व्यक्तीच्या मुलाची चौकशी केली तेव्हा हा ई-मेल आपणच पाठवल्याची कबुली त्यांनी दिली.

Related Posts
1 of 1,292

   मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार – अजित पवार

कॉम्प्युटर क्लासमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत माहिती देण्यात आली होती. सायबर गुन्ह्यांपासून स्वत:चा बचाव कसा करायचा हे देखील त्याला ऑनलाईन क्लासमध्ये शिकवण्यात आलं होतं. यातून जिज्ञासा जागृत झाल्याने त्याने हॅकिंग कसं होतं हे युट्युबवर पाहायला सुरुवात केली. यातून त्याने ई-मेल हॅक कसा करायचा, सायबर गुन्हे कसे होतात ही माहिती जमा केली आणि पहिला प्रयोग त्याने स्वत:च्या वडिलांवरच करून पाहिला अशी धक्कादायक माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

                    विवाहित महिलेचा माजी सरपंचपतीकडून विनयभंग, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: