सामाजिक उपक्रमातून बोरगे यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न

0 68

 

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील महाराष्ट्र शासन जलसंपदा कुकडी पाटबंधारे उपविभाग क्रं.४ वाडेगव्हाण अंतर्गत कुकडी सिंचन शा.क्रं.१ देवदैठण येथे प्रदीर्घ सेवेतून ३९ वर्षे सेवा करुण सेवानिवृत्ती झाल्याबद्दल किसन गणपत बोरगे यांचा सेवानिवृत्त सोहळा पार पडला. सेवापुर्ती सोहळा निमित्त बोरगे कुटुंबाने समाजाचं काहीतरी देणं लागतो.

या भावनेने ढवळगाव मधे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी झाडे भेट दिली. यानंतर यावेळी अनेक मान्यवरांनी बोरगे यांचा सन्मान केला व पुढी ल वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व किसन बोरगे यांची प्रदीर्घ सेवेतून निवृत्ती झाली.एक कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून जलसंपदा विभागात त्यांचा नावलौकिक राहिला आहे,किसन बोरगे हे पत्रकार अमोल बोरगे यांचे वडील आहे.

Related Posts
1 of 2,139

यावेळी पारनेर नगर चे आमदार निलेश लंके,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार,युवानेते अतुलदादा लोखंडे, मा.सभापती शंकर पाडळे,मा.जिल्हा परिषद सदस्य अनिलदादा विर,कुकडी साखर का. मा.संचालक बाळासाहेब पठारे,श्रीगोंदा खादी ग्रामोद्योग मा.चेरमन भगवानराव गोरखे,काँग्रेस विधानसभा वडगावशेरीचे अध्यक्ष रमेश सकट, शिरुरचे नगरसेवक दादाभाऊ लोखंडे,प्रा.केशव कातोरे,शिरुर खादीग्राम उद्योग चे चेअरमन चंद्रकांत सकट,शाखा अधिकारी संजय बोरुडे, कालवा निरीक्षक राहुल निकुंब,प्रकाश कुरंदळे, योगेश कौठाळे,सनी भोस,मा.अभियंता नागवडे रावसाहेब,कालवा निरीक्षक गायकवाड रावसाहेब,मुनिर शेख,कोळपे रावसाहेब,मा.सरपंच विजय शिंदे,सरपंच रवींद्र शिंदे,मा.सरपंच भाऊसाहेब पानमंद,मेजर रामचंद्र लोंढे,शिवाजी लोंढे,कैलास ढवळे,त्रीदल आजी माजी संघटनाचे बापु ढवळे मेजर त्यांचे सहकारी मेजर,सिनेअभिनेते संदिप बोरगे सर,मा.चेरमन गौतम वाळुंज,प्रविण शेंडगे,सुभाष नेटके,सदस्य राहुल बोरगे,महा.रा.मराठी पत्रकार संघ नगर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाचपुते,पत्रकार श्रीगोंदा ता.अध्यक्ष अंकुश शिंदे,पत्रकार अंकुश तुपे,योगेश चंदन,प्रमोद आहेर,रामदास कोळपे,बाळु कुल्लाळ सर,कुकडी पाटबंधारे विभागातील कर्मचारी,पत्रकार,ग्रामस्थ, नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता,यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब शिंदे हे होते,तर प्रासताविक मा.प्राचार्य राम शिंदे यांनी केले व सुत्रसंचालन निलेश औचिते यांनी केले.

जलसंपदा विभाग पहिल्यापासूनच एक अत्यंत संवेदनशील विषय राहिलेला आहे,त्यामुळे या संबंधित घटक देखील नेहमीच चर्चेत असतात.अनेकदा शेतकऱ्यांचा मोठा रोष पत्करावा लागतो मात्र नियमांच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांप्रती सहकार्याची भूमिका ठेवावी लागते आणि ते कौशल्य किसन बोरगे काका यांनी लवकरच आत्मसात केले होते आजच त्यांचा निरोप समारंभ त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा :- निलेश लंके ( आमदार पारनेर-नगर )

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: