सेक्स लाइफवर पत्नीने लिहिली पुस्तक; आयुषमान खुराना म्हणाला, मला…

0 258

 

मुंबई – बॉलिवुडचा (Bollywood) चर्चित अभिनेता आयुषमान खुराना (aayushman Khurana) नेहमी सोशल मीडियावर आपल्या चित्रपटामुळे चर्चेत असतो नुकताच त्याचा अनेक हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीमुळे आयुष्मान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

 

या मुलाखतीमध्ये त्याने तिची पत्नी ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) यांनी लिहिलेल्या ‘द 7 सिन्स ऑफ बिइंग अ मदर’ बद्दल मोठा खुलासा केला आहे. याच पुस्तकात ताहिरांन तिच्या आयुषमानसोबतच्या आपल्या सेक्स लाइफ विषयी मोठे खुलासे केले आहेत.

 

या मुलाखतीदरम्यान जेव्हा आयुषमानला विचारलं गेलं की,’ एक वाचक आणि पती म्हणून तुझ्या पत्नीचं ‘द 7 सिन्स ऑफ बिइंग अ मदर’ हे पुस्तक तुला कसं वाटलं?’ यावर उत्तर देत आयुषमान म्हणाला, वाचक म्हणू नक्कीच हे पुस्तक वाचण्यासारखं आहे असं मी म्हणेन. पण खरं सांगायचं तर मला स्वतःच्या पर्सनल गोष्टी लोकांसोबत शेअर करायला आवडत नाहीत. माझी पत्नी माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलणं आवडत नाही. आणि आम्ही दोघं याबाबतीत खूप वेगळे आहोत. अनेकांसाठी माझ्या पत्नीचं पुस्तक एंटरटेनिंग असेल कदाचित, पण मी ते अजून वाचलेलं नाही.

 

Related Posts
1 of 2,248

पुढे तहिरानं तुमचे बैडरुम सीक्रेट्स सगळ्यांसमोर मांडले तेव्हा तुला कसं वाटलं? असा प्रश्न विचारता आयुषमान म्हणाला, मला माहित नाही हे. तिच्या मनात जे येतं ते ती बोलून दाखवते, करते, पण मी तसा माणूस नाही.

 

 

ताहिराने तिच्या ‘द 7 सिन्स ऑफ बिइंग अ मदर’ या पुस्तकात खुलासा केला आहे की, आपल्या मुलासाठी पम्प केलेलं ब्रेस्ट मिल्क आयुषमान प्यायला होता. यासोबत पुस्तकाच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, मुलं झाल्यानंतर ती आयुषमानसोबत हनिमूनला गेली होती, पण तो हनिमून यशस्वी ठरला नाही.

 

 

ताहिरा कश्यप आणि आयुषमाननं 2008 मध्ये लग्न केलं होतं. दोघे शाळेपासून मित्र होते आणि मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. आयुषमान आणि ताहिरा आता दोन मुलांचे आई-बाबा आहेत. वरुष्का आणि विराजवीर अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: