संगमनेर तालुक्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; तपास सुरू

प्रतिनिधी DNA मराठी टीम
संगमनेर- तालुक्यातील तळे गाव दिघे (Talegaon Dighe) गावातील जुन्या चौकात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह (The body of a stranger) आढळल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि. १६) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून पोलीसांनी तपास सूरु केला आहे.
तळेगाव दिघे गावातील शनि मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला जुन्या चौकात पाण्याच्या हात पंपाशेजारी एका अंदाजे ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. नजीकच्या रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला.
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पो लीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर घटनेचा अधिक तपास करीत आहेत. सदर व्यक्ती कोण ? कुठली ? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे.