भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डचे संचालक मंडळ बरखास्त ….

0 10

अहमदनगर –  दोनदा दिलेली मुदतवाढ संपल्याने भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. १० फरवरी २०२० रोजी भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डचा कार्यकाळ संपुष्टात आला होता . त्यानंतर निवडणूकसाठी  नव्याने वॉर्ड रचना करत आरक्षणाची सोडत ही करण्यात आली होती .मात्र याच दरम्यान कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आल्याने  निवडणूक होऊ शकली नाही.

भिंगार खून प्रकरण नूरला ताब्यात घेताच गुटका लॉबी सक्रिय

मात्र मुदत संपलेल्या सदस्यांनाच सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ऑगस्टमध्ये दुसऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली. १० फरवरी २०२१ ला ती मुद्दत सुद्धा संपली. कॅन्टोन्मेंट कायद्यातील तरतुदीनुसार तिसऱ्यांदा बॉडीला मुदतवाढ देता येत नाही . यामुळे बोर्ड बरखास्त होऊन बोर्डाच्या कारभार हा अध्यक्ष ब्रिगेडियर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  या समितीकडे जातो.

मोदीजी तुम्ही ही चूक करू नका …….. – कंगना रानौत 

 

Related Posts
1 of 1,290

या कायद्यामुळे आता भिंगारचा कारभार या दोघांच्या समितीकडे असणार आहे ही समिती बोर्ड संबंधीचे निर्णय घेणार आहेत. तर अहमदनगर, पुणे, खडकी, देहूरोडसह राज्यातील सात व देशातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्डचा कार्यकाळ संपल्यामुळे बोर्ड बरखास्त करण्यात आली आहे. बोर्ड बरखास्त झाल्यानंतर पुढील निवडणूक होईपर्यंत ब्रिगेडियर आणि सीईओ ची समिती बोर्डाच्या कारभार पाहणार आहेत.

त्या दिवशी मी भाजपमध्ये प्रवेश करणार – गुलाम नबी आझाद

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: