
अहमदनगर ः लष्कराच्या येथील रूग्णालयातील एका डॉक्टरचे इंस्टाग्रामवरील फोटो व चॅटिंग चोरून त्यामध्ये छेडछाड करून त्याचे व्हिडीओ तयार केले. मार्फिंग केलेले व्हिडिओ (Blackmail based on video)डॉक्टरांच्या मित्र परिवाराला पाठविले. हे व्हिडिओ डिलिट करण्यासाठी ४३ हजारांची खंडणी घेणाऱ्याविरूद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
rohit pawar – कर्जत-जामखेडवर सीसीटीव्हीची नजर…
डॉक्टरांचे इंस्टाग्रामवर अकाऊंट आहे. त्यांच्या इंस्टाग्रामवरील अकाऊंटवरून त्यांचे खासगी फोटो व चॅटिंग चोरण्यात आली. त्यामध्ये छेडछाड करून त्याचा व्हिडीओ तयार केला गेला. तो व्हिडीओ इंस्टाग्रामवरील मित्र-मैत्रिणींना पाठविला गेला. सदरचा व्हडिओ शुक्रवारी (ता.१७) रात्री १२ वाजून ६ मिनिटांनी त्यांच्या मोबाईलवर आला. त्यांनी संबंधित मोबाईलवर संपर्क केला असता, ‘तुम्हाला जर हा व्हिडिओ डिलेट करायचा असेल तर मला होल्डर नाम राहुलकुमार असे असलेल्या एका मोबाईलवर नंबरवर २१ हजार ५०० रूपये पाठवा’,
Ahmednagar – अहमदनगरचे ‘शहाशरीफनगर’ करण्याची एम.आय.एम.ची मागणी ‘Shahsharifnagar’ of Ahmednagar
असे त्या फोनवरील व्यक्ती म्हणाली. डॉक्टरांनी तात्काळ २१ हजार ५०० रूपये संबंधित नंबरवर पाठविले असता, काही वेळाने पुन्हा फोन आला व पुन्हा २१ हजार ५०० रूपये मागितले. त्यांनी पुन्हा २१ हजार ५०० रूपये पाठविले. समोरच्या व्यक्तीला ४३ हजार रूपये पाठवून देखील त्यांचा मित्र-मैत्रिणींना पाठविलेला व्हिडिओ डिलेट केले नाही. अखेर त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अर्चिता गुप्ता या नावाने इंस्टाग्राम अकाऊंट असलेल्या व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.