अमरावतीत भाजपच्या बंदला हिंसक वळण, पोलिसांचा लाठीचार्ज

0 294
BJP's bandh in Amravati turns violent, police baton charge
अमरावती –  त्रिपुरा (Tripura) राज्यात झालेल्या अत्याचारा विरोधात अमरावतीत ( Amravati)  १२ नोव्हेंबर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 ते 20 हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात अमरावती शहरातील २० ते २२ दुकानात तोडफोड झाली. या घटनेच्या विरोधात आज भाजपाकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली होती. (BJP’s bandh in Amravati turns violent, police baton charge)
 आज सकाळी राजकमल चौक आणि गांधी चौकात अचानक शेकडो तरुण जमले. तोंडाला रुमाल आणि हातात काठ्या घेऊन आलेल्या या तरुणांनी संपूर्ण परिसरात जोरदार दगडफेक केली. या जमावाने दुकानांचीही तोडफोक करत जबरदस्तीने दुकाने बंद केली. हल्ला करणारे तरुण जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत असले तरी हे तरुण कोण होते हे समजू शकले नाही. आंदोलकांचा कोणत्या पक्षाशी संबंध आहे का हे ही समजू शकले नाही. दगडांनी दुकानांच्या कुलूप फोडल्या तोंडाला रुमाल लावून आलेल्या काही आंदोलकांनी हातात विटा घेऊन दुकानांच्या दिशेने फेकल्या. तर काही तरुणांनी दगडांनी दुकाने फोडले. काही तरुणांनी तर थेट रुग्णालयाला लक्ष्य केलं. या तरुणांनी रुग्णालयाच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांनी या जमावाला पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावासोबत पोलिसांची बाचबाची झाली. त्यामुळे पोलिसांना काही लाठीमार करावा लागला. मात्र, जमाव प्रचंड असल्याने त्यांना नियंत्रित करणं अशक्य होत होतं. शिवाय पोलिसांची कुमकही कमी असल्याने जमावाला पांगवताना पोलिसांची दमछाक होत होती.
Related Posts
1 of 2,107

या घटनेनंतर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जनतेला शांततेच आवाहन केलं आहे. कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये. अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल. याला कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी शांतता राखावी,” असं आवाहन अमरावतीच्या पालकमंत्री व महिला, बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं. (BJP’s bandh in Amravati turns violent, police baton charge)

अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार, पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: