ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण रद्द झाल्याने भाजपचे आंदोलन

0 119

शेवगाव  –  ओबीसी समाजाचे (OBC community) आरक्षण (Reservations) रद्द झाल्याबद्दल शेवगाव येथे भाजप (BJP) च्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले, ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने फेटाळल्यामुळे केवळ महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि नाकर्तेपणामुळे अखेर ओबीसी चे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.  जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, त्याचबरोबर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे, नाकर्त्या सरकारचा धिक्कार असो, या सरकारचे करायचे काय  खाली डोकं वर पाय, अशी घोषणाबाजी  करण्यात आली. त्याचबरोबर शेवगाव तालुक्यात पूरपरिस्थिती असताना पालक मंत्री अजून जिल्ह्यात फिरकले सुद्धा नाहीत, पुरग्रस्ता विषयी कोणतीही मीटिंग अजून पर्यंत झाली नाही, कोणत्याही प्रकारची मदत आत्तापर्यंत मिळालेली नाही,त्याच बरोबर हे सरकार अक्षम आहे.

Related Posts
1 of 1,603

ज्यावेळी आंदोलनात अमोल घोलप, भीमराव सागडे गंगा खेडकर, वजीर पठाण ,कचरू चोथे, गणेश कराड, डोंगरे बाळासाहेब , रामदास डोंगरे, संदीप वाणी अजय दमाळ, नितीन दहिवाळकर, अंकुश कुसळकर, गणेश कोरडे, शिवाजी भिसे ,कल्याण देवडे, राजेंद्र डमाळे, केशव आंधळे इ. कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

ATM कार्ड क्लोन करून फसवणूक करणा-या टोळीचा मुख्य आरोपीला अटक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: