पाच पैकी केवळ एका राज्यात भाजपची सत्ता येईल –  शरद पवार 

0 30

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलतांना देशात पुढच्या महिन्यात होणाऱ्या पाच राज्याच्या निवडणुकीवर आपली प्रतिकिया दिली आहे . पत्रकारांशी बोलतांना शरद पवार म्हणाले कि  देशात सुरू असणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत चार राज्यांत विरोधक पक्ष सत्तेवर येतील. तर केवळ एका राज्यात भाजपची सत्ता येईल. हा देशाला नवी दिशा देणारा ट्रेंड ठरेल, असे भाकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तविले.

Related Posts
1 of 1,323

 शरद पवार पत्रकारांशी बोलतांना ते पुढे म्हणाले कि  केरळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत डावे पक्ष आमच्यासोबत आहेत. केरळमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. तामिळनाडूत नागरिकांचा कल हा डीएमके आणि स्टॅलीन यांच्या बाजूने आहे, पश्‍चिम बंगालमध्ये भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. एक भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करीत आहे. तिच्यावर सगळे हल्ला करीत आहेत. पश्‍चिम बंगालचे लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या अस्मितेवर हल्ला झाल्यास ते राज्य एकसंघपणे उभे राहते. त्यामुळे तेथे ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, याची मला खात्री आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले. केवळ आसाममध्येच भाजपाची सत्ता आहे, ती कायम राखण्यात कदाचित ते यशस्वी होऊ शकतात. मात्र अन्य चार राज्यात परिवर्तन अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.

दरोडा, जबरी चोरीतील फरार आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या कोंबींग ऑपरेशनमध्ये जेरंबद..

तर भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी शेतकरी आतंकवादी व खलिस्तानी असल्याचा वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर शरद पवार म्हणाले की साक्षी महाराज यांना महत्त्व न देणे, हेच त्याचे खरे उत्तर आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सभागृहाचे बंद पडले. केवळ केंद्र सरकारने समंजसपणाची भूमिका घेतली नसल्याने सभागृहाचे कामकाज बंद पडले. राज्यसभा व लोकसभेचे कामकाज चालले नाही. उद्या काय होईल, ते बघू. मात्र, शेतकरी जसे अस्वस्थ आहेत. तशीच संसद देखील अस्वस्थ आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा शरद पवार यांनी केला स्वागत …

तर सचिन वाझे यांच्या बद्दल बोलताना शरद पवार म्हणाले कि सचिन वाझे यांना अटक झाली, यावर मी काही सांगू शकत नाही. हा लहान प्रश्‍न आहे, हे काय राज्याचे धोरण नाही, असे सांगून शरद पवार यांनी सांगून या विषयाला बगल दिली.

बोठे याच्या खिशात पोलिसांना सापडली सुसाईड नोट 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: