भाजप खासदाराच्या सुनेला मारहाण ? व्हिडिओ व्हायरल करत लावला गंभीर आरोप

0 408
नवी मुंबई –  कुटुंबाकडून मारहाण आणि अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस (MP Ramdas Tadas) यांच्या सुनेनं केले आहे. या आरोपांचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रामदास तडस यांच्या सुनेनं चाकणकर यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे.
या व्हिडिओत त्या म्हणतायेत, मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला, मी विनंती करते. या व्हिडिओमुळं राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
Related Posts
1 of 1,640

 

वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सून यांना गेली अनेक दिवस तडस कुटुंब मारहाण करुन अत्याचार करत आहेत. पुजाचा आताच हा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला. तातडीने पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदधिकारी व पोलिस संरक्षणासाठी पोहोचले आहेत, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: